ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जिल्हा परिषद ठाणे तयारीला लागले आहे. जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी सुटणार नाही, यासाठी तहसील कार्यालय, सर्व बैंक अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका तसेच युवकांनी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दि. 01 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका, सेतू कर्मचारी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करावे. प्रत्येक लाभार्थ्याने मदत करणाऱ्या युवकांनी, सेतू व सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक पात्र भगिनीचा अर्ज अपलोड होईल, याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन रोहन घुगे यांनी केले आहे. यावेळी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका, सेतू कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते. या योजनेत राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलेला दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत. योजनेसाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, हमीपत्र.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *