मुंबई : जुहु येथील श्रीमती रामदेवी शोभराज बजाज आर्य विद्या मंदिर‌ शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत असलेली युवा बॅडमिंटनपटू अकरा वर्षीय अनुश्री शिरीष मोडलिंबकरने विलिंग्डन जिमखाना ,खार रोड येथे संपन्न झालेल्या एस.आर.इनडोअर स्पोर्टस् बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत शानदार कामगिरी करताना दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. तिने बारा आणि पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात बाजी मारली. .बारा वर्षाखालील गटात अनुश्रीने काशवी उचीलचा आणि पंधरा वर्षाखालील गटात श्वेतलाना मुखर्जीचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. .आता‌पर्यंतच्या‌ छोट्या कारकिदीत अनुश्रीने १२ चषक आणि ५ पदकांची‌ कमाई केली आहे.सुरवातीला अनुश्रीला इनायत आणि तन्मय सरांचे मार्गदर्शन मिळाले.सध्या ती किरण देहारे बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. .किरण देहारे गेली तीस वर्षै या खेळाचे प्रशिक्षण देत आहेत..भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बुजूर्ग हॉकीपटू जोकिम कार‌व्हालो ,रुपीका रमण,सौरव घोष‌ यांच्या हस्ते अनुश्रीला पदके देऊन गौरविण्यात आले. ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *