पालघर : जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी बहूल तालुक्यातील मेढा या गावचे सुपूत्र रघुनाथ सखाराम गोलवड हे अत्यंत हालाखीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिक्षण घेवून पोलीस दलात रुजू झाले. रघुनाथ गोलवड हे आदिवासी समाजातील असून त्यांची सर्व सामान्यांप्रमाणे श्रध्दाळू असून सर्वांसाठी सर्वतोपरी सहकार्याची आणि परोपकाराची नेहमीच भुमिका असते. नुकतीच त्यांची भिवंडी येथे वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यांच्या पदोन्नतीने आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र तसेच सर्व स्तरांवरुन अभिनंदन आणि कौतुकांचा त्यांचावर वर्षावर होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *