राजीव चंदने

 

 

मुरबाड : केंद्र सरकारच्या हेलिपॅड धोरणानुसार तालुका स्तरावर हेलीपॅड तयार करण्यासाठी नागरी विमान संचालनालयाचे नियम पायदळी तुडवत एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या बाजूला भला मोठा नाला आणि खोल दरी असुन या धोकादायक जागेची पाहाणी न करताच किंवा कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांचा हेलिपॅडचे काम केले असल्याने या हेलिपॅड वर प्रवास करणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे व नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
केंद्र सरकारने हेलिपॅड धोरणानुसार प्रत्येक तालुकास्तरावर हेलिपॅड तयार करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या विमान संचालनालयाचे नियम लक्षात घेऊन प्रथम जागा निश्चित करुन विमान संचालनालय मुंबई यांना अहवाल सादर करणे.व त्यांचे पाहाणी अहवाला नंतर काम सुरू करणे अशा अटी व शर्ती असताना मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा आधार घेत . प्रत्येक पार्टीचे नेते हे मुरबाड मध्ये निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टर ने येतील त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या हेलिपॅडवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते. बांधकाम विभागाने त्याच ठिकाणी अंतिम मंजुरी देत एका बाजूला भला मोठा नाला, खोल दरी, आणि वाहतुकीची वर्दळ असणारा राष्ट्रीय महामार्ग याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने विचार न करता त्या ठिकाणी तालुका स्तरावरील हेलिपॅड कायम करुन तेथे बांधकाम केल्याने या धोकादायक जागेची केंद्र सरकारच्या विमानचालन संचालयाच्या पथकाने पाहाणी केली की नाही.शिवाय या धोकादायक जागेला मंजुरी कोणी दिली.दरम्यान मुरबाड मध्ये कल्याण मुरबाड रोड लगत देवगाव फाटा,माल्हेड,खानिवरे या ठिकाणी याठिकाणी सपाट मैदाने असताना या धोकादायक जागेत हेलिपॅड तयार करण्यासाठी कोणी परवानगी दिली याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

!! सदरची जागा तहसीलदार मुरबाड यांनी निश्चित करुन त्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचे आदेश दिले – कैलास पंतिगराव.उप अभियंता बांधकाम विभाग मुरबाड.

सदरची जागा योग्य असल्या बाबत विमान संचालनालयाने पहाणी अहवाल दिला आहे की नाही याची चौकशी तहसीलदारांना करण्याचे आदेश दिले जातील – विश्वास गुजर.उप विभागिय अधिकारी कल्याण.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *