ठाणे : तंबाखू खाणे आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे सांगून देखील तंबाखूची सवय सोडत नाहीत. मात्र याचा विपरीत परिणाम होऊन, मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने, सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या ठाणे सिव्हील रुग्णालयात तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोग झालेल्या महिलेची जोखमीची कमांडो शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे ती ही अगदी मोफत
ठाण्यात रहाणाऱ्या पन्नास वर्षीय महिलेला तंबाखू खाण्याची सवय असल्याने अनेक दिवसांपासून जीभ जाड झाली होती. बोलताना जेवण जेवताना भरपूर त्रास होत होता त्यामुळे सामान्य रुग्णालयात या तपासणीसाठी आली असताना दंत चिकित्सक डॉ.अर्चना पवार यांनी तपासणी केली असता संशय आल्याने जिभेची बायप्सी केली आणि यामध्ये जीभेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि जिभेची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती दंत शल्य चिकीत्सक डॉ. अर्चना पवार यांनी दिली.महिलेची सर्व रक्त चाचणी झाल्यावर, शारीरिक स्वास्थ्य याची तज्ज्ञ डॉक्टर कडून तपासणी केली गेली. दरम्यान सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता. त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी अंको सर्जन डॉ. हितेश सिंगवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, भूल तज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, या बरोबर मिलींद दौंड, जागृती, गायकर, प्रिय पगारे, स्मिता माळी, रत्नाकर ठाकरे, मदन यादव ही टीम उपस्थितीत होती
मौखिक कर्करोगाची कमांडो शस्त्रक्रिया म्हणजे कमांडो म्हणजेच मुखकर्करोग मुळे मानेकडील गाठ व जिभेचा संसर्गित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकणे
जिल्हा सामान्य रुग्णालयात दंत विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोग या विषयी माहिती दिली जाते. गेल्या वर्षभरात १५ हजारावर नागरिकांचे मौखिक कर्करोग विषयी समुपदेशन करून तपासणी
डॉ. अर्चना पवार दंत शल्य चिकीत्सक यांच्या मार्फत करण्यात आली अंकोसर्जन.हीतेश सिंघवी (महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स) हे महिन्यातून एकदा मंगळवारी सामान्य रुग्णालयात सकाळी १० ते १ पर्यंत उपस्थितीत असतात
खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर गरीब गरजू रुग्णांना उपचार घेणे परवडणार नाही त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगीना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. यासाठी खाजगी कर्करोग तज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात हा गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा आहे ठाणे जिल्हा शल्या चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी आवाहन केलं आहे की रुग्णांनी जास्तीत जास्त शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *