नवी दिल्ली:  रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिल्लीत येऊन काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी मुकेश अंबानी आले होते. यावेळी संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही त्याठिकाणी उपस्थित असल्याचे कळते.

मुकेश अंबानी यांची गाडी सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील 10 जनपथ निवासस्थानावरुन बाहेर पडताना दिसल्यानंतर सगळ्यांना या भेटीबद्दल कळाले. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे येत्या 12 जुलैला लग्न आहे. याच विवाहसोहळ्याचे सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी दिल्लीत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *