मुंबई : येत्या ५ जुलै  ते 10 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रती अधिक असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्यापासून पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत एमजेओ व मान्सुनच्या तसेच तटीय अशा दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे. गेल्या 10 दिवसापासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर, नंदुरबार धुळे जळगांव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगांव देवळा तालुक्यात अजुनही कायम आहे. परंतु रविवार दिनांक 7 जुलैपासुन या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणल्यातून मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच असल्याचे खुळे म्हणाले.

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात उद्या शुक्रवार दिनांक 5 जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *