ठाणे : संस्कार भारती ठाणे महानगर समिती तर्फे गोकुळाष्टमी निमित्त होणाऱ्या चित्रकला स्पर्धांचे आयोजन रविवार २८ जुलै २०२४ रोजी, एन. जी. बेडेकर कॉमर्स कॉलेज , चेंदणी ठाणे येथे सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे.
विषय: इयत्ता पहिली आणि दुसरी (दिलेले जाणारे चित्र रंगवणे); तिसरी व चौथी(बालकृष्ण) ; पाचवी ते सातवी(पावसाळी निसर्ग चित्र);आठवी ते दहावी(वृक्षारोपण); खुला गट (अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र) याच ठिकाणी कात्यायनी सभागृहात गुरू पौर्णिमा निमित्त “पर्जन्य गुरू” हा पाऊस विषयावरील कत्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम सुप्रसिद्ध कत्थक नृत्यांगना सौ मयुरी भिडे आणि त्यांच्या शिष्या सकाळी १० ते १२ या वेळेत सादर करणार आहेत. सर्व स्पर्धकांनी संधीचा लाभ घ्यावा आणि रसिकांनी कार्यक्रमास यावे असे आवाहन ठाणे महानगर समिती अध्यक्ष डॉ. कीर्ती आगाशे यांनी केले आहे.स्पर्धेसाठी संपर्क : ९००४३९१२२२ / ८९२८६७५२८५
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *