राजीव चंदने
मुरबाड : कल्याण येथील नवजीवन सहकारी पतपेढीच्या सभागृहात झालेल्या माळशेज रेल्वे क्रुती समितीच्या सर्वसाधारण सभेत, समितीच्या सरचिटणीस पदी मुरबाडचे भुमीपुत्र तथा पत्रकार मंगल डोंगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कल्याण-मुरबाड-माळशेज घाट-नगर पर्यंत रेल्वे झालीच पाहिजे. या दिनेशचंद्र हुलावले, यांच्या माळशेज रेल्वे क्रुती समिती स्थापन झाल्या पासून, अनेक धरणे आंदोलने, रेल्वे परिषदा,पाच लाख सह्यांची मोहीम ,तसेच हा रेल्वे मार्ग मंजूर व्हावा. त्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाला वर्तमानपत्रात प्रसिद्धी देणे,गावोगावी घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये डोंगरे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली असल्याने, क्रुतीसमितीची चळवळ यापुढेही अशीच तेवत ठेवण्यासाठी डोंगरे यांची निवड करण्यात आली असल्याचे माळशेज रेल्वे क्रुतीसमितीचे संस्थापक अध्यक्ष, दिनेशचंद्र हुलावले यांनी शुभेच्छा देताना सांगितले. यावेळी विठ्ठल वाळुंज गुरुजी-संस्थापक नवजिवन सहकारी पतपेढी, गोरक्ष रंधे-माजी सरव्यवस्थापक यशोमंदिर पतपेढी, हरिभाऊ वाळुंज-अध्यक्ष नवजिवन पतपेढी, विलास जाधव,बाळ घोरपडे, मनोज देसले,गणेश अडसूळ, यांसह पत्रकार अशोक पाटोळे,सचिन बुटाला,जगदीश खंबाळे, कुणाल म्हात्रे, प्रविण आंब्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित यावेळी उपस्थित होते. भविष्यात कल्याण-नगर रेल्वे मार्गाला मुर्त स्वरूप येण्यासाठी मुरबाड तालुक्यातुन जोरदार चळवळ उभी करुन,यापुढे होणा-या अनेक लढ्यांमध्ये जनसामान्यांचा सहभाग वाढावा.आणि बहुप्रतिक्षित असणारा रेल्वे प्रकल्प उभा राहून, दळणवळणाची समस्या सुटावी. रोजगार निर्मिती व्हावी. जर हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट मुंबई मध्ये मार्केट मिळेल.
त्यामुळे कल्याण-अहमदनगर माळशेज मार्गे रेल्वे मार्ग किती गरजेचा आहे. त्यामुळे तो झालाच पाहिजे. त्याचा क्रुतीसमितीने केलेला पाठ पुरावा आणि हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे घाट रेल्वे प्रोजेक्ट महाराष्ट्र म्हणून नोंद असलेला हा रेल्वेमार्ग पुर्णत्वास जावा यासाठी आजही क्रुती समिती कार्यरत असुन भविष्यात हा रेल्वे मार्ग होत नाही. तोपर्यंत यापुढे क्रुती समिती अतिशय तिव्रतेने जन आंदोलन छेडत राहणार असल्याचे माळशेज रेल्वे क्रुती समितीचे नवनिर्वाचित सरचिटणीस मंगल डोंगरे यांनी नियुक्ती नंतर उपस्थितीतांशी बोलताना सांगितले.याशिवाय लवकरच मुरबाड तालुका कार्यकारिणी ची निवड करून तालुक्यातील या मार्गालगत असणाऱ्या नाक्यालगतच्या गावातील नवतरुण कार्यकर्त्यांचा क्रुतीसमितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
00000
