महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने

मुंबई  : महायुती सराकारच्या महागाई विरोधातील घोषणांनी पावसाळी अधिवेशनाच्या आजचा आठवा दिवस दणाणला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’, ‘सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’ अशा गगनभेदी घोषणा देत विधानभवन परीसर दणाणून सोडला.

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.

भाजी महागली कडधान्य महागले, महागाईने मध्यमवर्गीय कोलमडले, सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी, सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई, महागाईने जनता त्रस्त महायुती सरकार वसुलीत व्यस्त…

सरकार आहे वसुलीत मस्त महागाईने जनता त्रस्त, खोके सरकार हाय हाय, महागाईवर नियंत्रण न ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बियाणांचा दर वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महागाई हाय हाय, केंद्रसरकार हाय हाय अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत वाढत्या महागाई विरोधात महाविकास आघाडी आमदारांनी आक्रमकपणे गगनभेदी घोषणा देत महायुती सरकारला घेरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *