ठाणे : कोपरी शांती नगर परिसरात सार्वजनिक शौचालयाची चांगली व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय होत होती. परंतु माजी ज्येष्ठ नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी ठाणे महापालिकेने सुसज्य सार्वजनिक शौचालय बांधून दिले आहे. या शौचालयात भारतीय अणि इंग्रजी अशी दोन्ही सुविधा देण्यात आल्या आहेत.
शांती नगर परिसरात शौचालयाची चांगली सोय नसल्यामुळे या ठिकाणी चांगले शौचालय बांधण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नवनिर्वाचित ख़ासदार नरेश म्हस्के साहेब यांना माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील आणि रमाकांत (दादा) पाटील यांनी शौचालयाची बाब निदर्शनास आणली. एकनाथ शिंदे यांनी देखील याची दखल घेऊन, तात्काळ सदर कामाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. त्यानुसार याठिकाणी अद्यावत शौचालय उभे राहिले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यासाठी वेगवेगळी सोय शौचालयात असल्याची माहिती रमाकांत (दादा) पाटील यांनी दिली. या प्रसंगी विभाग प्रमुख प्रशांत पाटील, उपविभाग प्रमुख जमीर सय्यद, उपविभाग प्रमुख गणेश मुदलीयर, उपविभाग प्रमुख संतोष सकट, उपविभाग प्रमुख राजेंद्र सोनी, उपविभाग प्रमुख हेमंत राऊत, शाखाप्रमुख मनीष साळवे,शाखाप्रमुख तेजस दळवी,शाखाप्रमुख गणेश मालुसरे, कोपरी पाचपांखाडी युवासेना विधानसभा समन्वयक मयूर ठाकूर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक अवधूत कदम, उपशाखाप्रमुख अनिल भालेराव, उपशाखाप्रमुख अभिषेक इंगळे, उपशाखाप्रमुख योगेश नवगिरे, सुवर्णा फॅब्रोटेक प्रा. लीचे वैभव मापारी,न्यू गावदेवी रिक्षा स्टॅंडचे अध्य्क्ष शिवाजी बोबडे, अतुल महाडिक गट प्रमुख, अरविंद महाडिक युवासेना, सुरज माने युवासेना तसेच महिला आघाडीच्या सुषमा दिवेकर, भारती पाटील, ज्योती तावडे, संगीता राठोड, मीनाक्षी शिरसाठ, शर्मिला पवार, सुनीता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
0000
