ठाणे :संजय केळकर यांच्या पुढाकाराने व प्रेरणा संस्थेच्या वतीने, मी होणार ठाण्याचा टॉपर या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या स्पर्धेतील १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळेचा सत्कार सोहळा रविवार ७ जुलै ११ ते २ या वेळेत गडकरी रंगायतन येथे प्रमुख पाहुणे आमदार श्री. निरंजन डावखरे यांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी सरस्वती सेकंडरी स्कुलची अनन्या सुहास कुलकर्णी व आनंदीबाई केशव जोशी शाळेची अनुष्का वैभव जोशी यांनी १०० गुण टक्के मिळवत ठाणे शहरात पहिला क्रमांक पटकावला, तर १२ वी सायन्स मध्ये हेमांग राघवेंद्र कुलकर्णी ९४ टक्के गुण तर १२ वी कॉमर्स मध्ये सार्थक निशांत सुर्वे हे ठाणे शहरात प्रथम आले.१० वी चे १५ विद्यार्थी १२ वी च्या १० विद्यार्थ्यांचे ,शाळा , कॉलेज यांचा ट्रॉफी देऊन आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, जेष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, ठा. म. पा. परिवहन सदस्य विकास पाटील, कोचिंग क्लास संचालक संघटना अध्यक्ष सतीश देशमुख, भाजपा ठाणे शहर चिटणीस संतोष साळुंखे, सचिन केदारी, प्रेरणा संस्थेचे सदस्य धीरज महालकर, अंकित परब, आशिष थत्ते, शिवाजी मोरे, सुधाकर भोसले शेखर साळगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी दिली.
00000
