महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. या प्रचंड धावपळीतही विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. जितेंद्र भोळे यांची ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ पत्रकार श्री. विलास मुकादम आणि श्री. सत्यवान ताठरे यांच्या समवेत तसेच विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक, साहित्यिक श्री. नीलेश मदाने यांच्या उपस्थितीत भेट घेतली. यावेळी योगेश वसंत त्रिवेदी यांनी कोरोना काळात लिहिलेले ‘पासष्टायन’ हे पुस्तक श्री. जितेंद्र भोळे यांना सस्नेह भेट दिले. अधिवेशनानंतर नक्कीच हे पुस्तक वाचण्याची ग्वाही श्री. भोळे यांनी आवर्जून दिली.
