बरोबर २७७ दिवसांपूर्वी इस्त्रायलने हम्मास बंडखोरांचा उच्छाद कायमचा संपवण्याचा विडा उचलला आणि गाझा पट्टीवर प्रचंड बाँबहल्ले् केले आणि नंतर तिथे थेट रणगाडेही घुसवून आक्रमण सुरु केले. गाझा पट्टीतील शहरे, गावे, खेडी, अरब टोळ्यांची ठाणी सारे उद्धवस्थ करत, इस्त्रायली सैन्य पुढे सरकत राहिले. त्या युद्धात भयंकर नरसंहार झाला. तीस हजार पॅलेस्टाईनी अरब बंडखोर व सामान्य अरब नागरिक ठार झाले. जखमींची संख्या लाखांत आहे. त्याच वेळी इस्त्रायलचेही किमान दोन हजार सैनिक मारले गेले आणि युद्ध सुरु होण्याचे तात्कालीक कारण झाले होते त्यात हमास बंडखोरांनी इस्त्रयालच्या अडीचशे नागरिकांना, बायका पोरांना पळवून नेले व गाझा पट्टटीत ओलीस ठवले. त्यांची अद्याप सुटका होणे बाकी आहे. हमासने त्या पहाटे केलेल्या क्रूर दहशतवादी हल्लयात जवळपास दोन हजार इस्त्रायली नागरीक ठारही झाले होते. इतके महाभयंकर नुकसान झाले नरसंहार झाला. पण इस्त्रायल हमास युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाही. बेंजामीन नेतन्याहू या कणखर आणि पॅलेस्टाईनींच्या विरोधात नेहमीच कठोर भूमिका घेणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वात सध्या इस्त्रायलमध्ये युद्धकालीन सर्वपक्षीय सरकार कार्यरत आहे. त्यांनी जुन्या नव्या सर्व सौनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्त्रयल हा सध्या जगातील असा एकमेव देश आहे की जिथे प्रत्येक तरुणाला ठराविक काळाची लष्करी सेवा अनिवार्य केलेली आहे. अलिकडे काही अरब देशांच्या मध्यस्थीने हमासचे पॅलेस्टाईनी बंडखोर आणि इस्त्रायल सरकार यांच्यात तह होण्यासाठी वाटाघाटी सुरु आहेत इस्त्रयालने मागेच स्पष्ट केले आहे की जोवर हमास सर्व ओएलिसांची बिनशर्त सुटका करत नाही तोवर युद्ध थांबणारच नाही. ते थांबावे यासाठी जगातील अनेक राष्ट्रांनी पुढाकार घेतला. अमेरिकचे अध्यक्ष जो बायडेन यांनी तसचे त्याच्या सरकारमधली अनेक उच्चपदस्थ मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी जेरुसलेम तसेच तेल अव्हीव या इस्त्रायलच्या राजधानीला भेटी दिल्या. कातारची राजधानीत दोहा येथे अलिकडेच इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हीड बर्नी हे अचानक पोहोचले. ही भेट अर्थातच गुप्त स्वरुपाची होती. कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रेहमान अल थानी यांच्यासी बर्नी यांनी चर्चा केली. ती चर्चा संभाव्य हमास इस्त्रायल शांतता करारा संदर्भातच होती. दोन्ही बाजूंनी शांततेची इच्छा जरी व्यक्त केलेली असली तरीही दोन्हींच्या शासनांनी मान्य कऱण्याच्या अटींमध्ये बरेच अंतर आहे. इस्त्रयलला आधी ओलिसांची सुटका हवी आहे तर हम्मासला अशी रास्त भीती वाटते की जोवर सैन्य मागे घेतले जाणार नाही तोवर जर ओलिसांची सुटका केली तर हे युद्ध इस्त्रयाल थांबवले याची हमी दिसत नाही. अमेरिकेच अध्यक्ष जो बायडेन ायंनी जे शांततेच प्रयत्न केले त्यात दोन्ही बाजूंनी त्यांच्याकडे निरोप देण्यात आले होते. हमासने नेमकी काय मागणी केली हे पुढे आले नसले तरी त्यांनी कायमची शस्त्रसंधी कऱण्याची मागणी पुढे ठेवली होती. तर इस्त्रायलने अशी भूमिका घेतली की जरी आत्ता शांतता मान्य झाली तरी गाझामध्ये कधीही परत युद्ध सुरु करण्याची मुभा इस्त्रायला ठेवली जावी, अशी अटच त्यांनी घातली आहे. या अटी उभय बाजूंना मान्य होण्याची शक्यता नसल्याने अद्याप शांतता दूरच दिसते आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी वारंवार अशीच भूमिका घेतली आहे की हम्मासला पूर्ण उखडून काढले पाहिजे. त्याशिवाय इस्त्रायलसाठी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. पण आता नेतन्याहू यांच्यावर देशांतर्गत दबाव वाढतो आहे. त्यांच्या सरकारमधलीच घटक आता युद्ध थांबवले पाहिजे, या विचारांना पोचलेले आहेत. इस्त्रयाली सैन्याधिकाऱ्यांनी अधिकृत पत्रकार परिषदेतही हे सांगतिले आहे की जर कोणाला असे वाटत असेल की हम्मासला संपवता येईल तर तो भ्रम ठरले कारण हम्मास हा एक विचार ाहे आणि तो पॅलेस्टाईनमधील प्रत्येक व्य्कतीच्या मनात ाहे. इस्त्रयालमधील काहीना त्यांनी अशीही भूमिका घेतली आहे की गाझा पट्टीमधली हमासच्या शासनाला इस्त्रायलने मान्यता देण्यास काय हरकत आहे. इतक्या टोकाची भूमिका घेऊन इस्त्रायलच्या गाझा पट्टीतील युद्धाच्या तात्विक पायालाच हादरे बसत आहेत. त्याचा परिणाम इस्त्रायलमधील राजकीय स्थितीवर नक्कीच झालेला भविष्यकाळात दिसणार आहे. या युद्धात इस्त्रयालचा श्कतीपातही मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि जरी हम्मास बंडखोरांचे कंबरडे मोडले असले तरी त्यांचा इस्त्रयाल विरोध पूर्णतः संपण्याची चनिन्हे अजुन दिसत नाही.गाझामधील युद्धविरामासाठी आपण अमेरिकेच्या योजनेला प्रतिसाद दिला असल्याचं हमासने सांगितलं आहे. मात्र यासाठी इस्रायलने गाझात कायमस्वरूपी युद्धविरामाचे वचन द्यावे असं हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहेच. सोमवारी रात्री संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिलेल्या प्रस्तावित युद्धविराम योजनेत सहा आठवड्यांच्या युद्धविरामाची मागणी करण्यात आली आहे. ही दीड महिन्यांची शांतता प्रस्थापित झाल्यावर तीच पुढे आणखी वाढवता येईल असा सुरक्षा परिषदेचा होरा दिसतो आहे.
कतार आणि इजिप्त यांनी अमेरिकेसह, इस्रायल आणि हमास यांच्यातील वाटाघाटींमध्ये मध्यस्थी केली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पॅलेस्टिनी गटाने त्यांचे उत्तर सादर केले आहे.
मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या निवेदनात, हमासने गाझामधील लढाई थांबवण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही आमच्या पॅलेस्टिनी लोकांच्या हितसंबंधांना प्राधान्य देतो आणि गाझावरील चालू असलेल्या आक्रमणास पूर्णपणे थांबविण्याच्या आवश्यकतेवर भर देतो,” असा हमासचा दावा आहे. त्या बरोबरच हे युद्ध संपवणाऱ्या करारापर्यंत पोहोचण्यासाठी सकारात्मक सहभाग घेण्यास तयार असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की हमासने प्रतिसाद दिला हे बरं झालं. अमेरिकन अधिकारी त्यांच्या विनंतीचे मूल्यांकन करत आहेत. याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी सांगितले होते की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा युद्धविराम योजनेसाठी आपण सिद्ध असून हमासच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत असे म्हटले होते. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी मांडलेल्या प्रस्तावात सुरुवातीच्या सहा आठवड्यांच्या युद्धविरामाचा समावेश होता, ज्यामध्ये हमासने काही ओलिसांना सोडावं त्या बदल्यात इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी असं म्हटलं होतं. दुसऱ्या टप्प्यात हमासने उर्वरित ओलीस सोडावे आणि युद्धविरामाचा भाग म्हणून गाझामधून संपूर्ण इस्रायली सैन्य माघार घेईल. इस्रायलने जो प्रस्ताव दिलाय तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. 31 मे रोजी इस्रायलच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या विधानात जे काही सांगितलं त्यापेक्षा ते वेगळं आहे का याबाबत स्पष्टता नाही.नेतन्याहू यांनी कबूल केलंय त्यांच्या युद्धकालीन सर्वपक्षीय मंत्रिमंडळाने या योजनेला स्पष्ट समर्थन दिलेले नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत उजव्या विचारसरणीच्या सदस्यांनी युती सोडण्याची आणि करार पुढे गेल्यास तो संपुष्टात आणण्याची धमकी दिली आहे, आणि हमासचं हे आत्मसमर्पण म्हणून पाहिलं जाईल अशीही भूमिका घेतली आहे. ब्लिन्केन यांनी तेल अवीवमध्ये इस्रायली अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांच्या हॉटेलबाहेर निदर्शकांनी अमेरिकेचे झेंडे हातात धरून घोषणाबाजी केली. अनेकांनी ओलिसांची छायाचित्रे हातात धरून ‘एसओएस अमेरिका, आमचा जीव वाचवा’ आणि ‘आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो, ब्लिंकन, करारावर शिक्कामोर्तब करा’ अशा घोषणा दिल्या. 7 ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळीच हमासने इस्रायलवर जो अचानक हल्ला केला त्यात सुमारे 1,200 लोक यात मारले गेले होते तर लहान मुले व स्त्रियांसह 251 लोकांना ओलिस म्हणून गाझाला नेण्यात आलं. गाझामधील हमास शासनाचे म्हणणे असे आहे की युद्ध सुरु झाल्यापासून आजवर इस्रायलच्या हल्ल्यात 37,000 हून अधिक पॅलेस्टाईनी अरब लोक मारले गेले आहेत.लाखो जखमी झाले असून जवळपास वीस लाख लोकांना घरेदारे सोडून पळावे लागले आहे. बेचिराख गाझा पट्टीतून इस्त्रयालला काय मिळणार हाही एक प्रश्नच आहे.
