मुंबई: चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन २० ते २२ जुलै २०२४ दरम्यान चेंबूर जिमखाना, चेंबूर ( पश्चिम ), मुंबई – ७१ येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपली नावे आपल्या क्लबमार्फत जिल्हा संघटनेकडे दिनांक ११ जुलै २०२४ पर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.
