दिवसभरात 256 किलो प्लॅस्टिक जप्त; एकूण 1 लाख 27 हजारांचा दंड वसूल

 

 

 

 

ठाणे : ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि प्रदुषण नियंत्रण विभागामार्फत संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लॅस्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 293 आस्थापनांना भेटी देवून 256 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून यापोटी एकूण 1 लाख 27 हजार 100 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समितीअंतर्गत 32 आस्थापनांना भेटी देवून 04 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 6 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कळवा प्रभाग समितीअंतर्गत 30 आस्थापनांना भेटी देवून 11 किलो प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 13 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमितीअंतर्गत 23 आस्थापनांना भेटी देवून 50 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करुन एकूण 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
उथळसर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 35 आस्थापनांना भेटी देवून 30 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 57 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत 25 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो प्लॅस्टिक जप्त करुन 14 हजार. इतका दंड वसूल करण्यात आला.
वागळे इस्टेट व लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 68 आस्थापनांना भेटी देवून 20 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 8 हजार 100 रु. इतका दंड वसूल करण्यात आला.   वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत एकूण 35 आस्थापनांना भेटी देवून 08 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करुन एकूण 9 हजार 500 रु दंड वसूल करण्यात आला.
माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत एकूण 45 आस्थापनांना भेटी देवून एकूण 125 किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त करुन एकूण 41 हजार 500 रु. इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई दरम्यान प्रभागसमितीस्तरावरील उपमुख्यस्वच्छता यांच्यासह प्रभागसमितीतील कर्मचारी व सफाई कामगार उपस्थित होते.  सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबतची कारवाई नियमितपणे शहरात सुरू राहणार असून नागरिकांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *