जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट- क सरळ सेवा भरती 2023
ठाणे : जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील परिक्षा केंद्राची निवड केलेल्या आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील परिक्षा 18 जुलै ते 30 जुलै पर्यंत होणार आहेत. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर परिक्षे संदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सरळ सेवा भरती पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलै रोजी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, 19 व 23 जुलै रोजी आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), 20, 22 व 23 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 40%, 19 व 24 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), 25,29 व 30 जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरील आयबीपीएस द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.
विशेष सुचना ज्या महिला उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी मूळ राजपत्र अधिसूचना / त्यांचे विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल. अन्यथा महिला उमेदवारांना परिक्षेसाठी बसू दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
000000
