रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) आणि मानवी हक्क (Human Right) शिक्षणक्रम या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १ जुलै २०२४ पासून सुरवात झाली असून सदर प्रवेश ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या वेबसाईट (https://ycmou.digitaluniversity.ac) वर सुरु असणार आहेत.
पत्रकारिता (Journalism) क्षेत्रात उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका आणि सामाजिक क्षेत्रात उपयुक्त मानवी हक्क शिक्षणक्रम या कोर्सचे प्रवेश रत्नागिरीतील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट येथे या शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु आहेत. पत्रकार होण्यासाठी उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम हा १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच मानवी हक्क शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण तसेच १० वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. तसेच बी.एड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दोन्ही कोर्स केल्यानंतर ७ गुणांचे भारांक मिळणार आहे. या कोर्सेच्या प्रवेशप्रक्रिया संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी संपर्क क्र. ९७६३०४७७८७, ९६०७८०९३४३, ९९२१८७९६६० येथे संपर्क साधावा.
000000