खरीप हंगामसाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोनस पासून शेतकरी वंचित
राजीव चंदने
मुरबाड : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक वर्ष कार्यान्वीत असलेल्या आधारभुत किंमत धानखरेदी योजने अंतर्गत सब एजंट म्हणून नियुक्त केलेल्या मुरबाड तालुका शेतकरी संघाने २०२० -२१ मध्ये ३१ मार्च पर्यन्त ३८२२ शेतकऱ्यांचे ९३ ३३५ . ७२ क्विंटल भात खरेदी करून पावत्या दिल्या . मात्र सततचा विज पुरवठा खंडीत होणे, इंटरनेट सेवा बंद होणे, या बाबीमुळे ५९६ तालुक्यातील शेतकऱ्यांची ऑन लाईन नोंदणी ३१ मार्च पर्यंत झाली नाही. त्यांच्या नोंदणी नंतर केली. यामुळे तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रती क्विंटल ५oo रु बोनस पासुन वंचीत राहीले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचा दोष नसतांना त्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी सतत पाठपुरावा केला असून नागपुर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी,अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपणांस बोनस देऊ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला ५ महिने होऊन ही आश्वसनाची पुर्तता होत नसल्याने त्यांनी २८ . ६ २४ रोजी . आझाद मैदान येथे उपोषण केले असता सचीव अन्न नागरी पुरवठा विभाग यांनी सर व्यवस्थापकीय संचालक यांना याबाबत बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच शेतकरी संघ व आदिवासी सेवा सोसायटी वरील ताण कमी व्हावा म्हणुन शासनाने . सर्व सेवा सोसायट्यांना भात खरेदी करण्यास परवानगी द्यावी . अशी मागणी सुद्धा केली आहे. नुकतीच अंमलात आणलेल्या लाडक्या बहिणी साठी योजना राबवणाऱ्या सरकारने दुर्लक्षीत राहिलेल्या शेतकरी वर्गाचे ५ ९६ शेतकऱ्यांचे १४ १७५ . २७ क्विंटलचे रू ५०० रू प्रमाणे बोनसची रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी लोकमित्र रमेश हिंदुराव . सभासद मुरबाड तालुका शेतकरी संघ .यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री . व अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या कडे लेखीपत्रा द्वारे केली आहे.
००००
