करायला गेलो एक, आणि झाले भलतेच अशी अवस्था शनिवारी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची झालेली दिसली!! या तिघांनी भाजपा बरोबरच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मतांची मोठ्या प्रमाणात फाटाफूट होणार अशी भाकिते केली होती. शुक्रवारीच मुंबईत झालल्या एक पक्ष प्रवेश समारंभात शरद पवारांनी उदगीरचे भाजपा नेत माजी आमदार भालेराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल करून घेतले होते आणि सांगितले होते की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार. आम्हा तिघा पक्षांना मिळून विधानसभेतील 225 जागांवर विजय मिळेल. नाना पटोले तसेच शरद पवारांचे नातू आमदार रोहीत पवार हे सत्तारूढ बाजूच्या आमदारांच्या फाटाफुटीचे संकेत देत होते. ते सारे आता फोल ठरते आहे. विधानसभेमधून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या 11 जागंसाठी जे मतदान झाले त्यात विधानसभेतील किमान सव्वा दोनशे आमदार हे फडणवीस, शिंदे आणि दादांच्या नेतृत्वावर आजही ठाम विश्वास ठेवून आहेत हे स्पष्ट झाले आहे. एमआयएम आणि समाजवादी पार्टीसह हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, बच्चु कडूंचा स्वाभिमानी पक्ष यांनी कोणीच शरद पवारांचे उमेदवार रायगडचे शेकापचे नेते जयंत पाटील यांना मदत केलेली नाही हेही स्पष्ट झाले. त्याच बरोबर हितेंद्र ठाकूर यांनी उद्धव ठाकरेंकडेही आपली मते दिलेली नाहीत. बविआनेही भाजपा सोबतच मतदान केले हे स्पष्ट झाले आहे. अत्यंत चुरशीने लढवल्या गेलेल्या विधान परिषद निवडणुकीत फडणवीस, शिंदे व अजितदादा पवारांची ऱणनीती पूर्ण यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या आमदरांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिकची मते या निवडणुकीत खेचली आहेत. अजितदादा गटाचे आणि एकनाथ शिंदेंचे आमदार हे मोठ्या प्रमाणात शरद पवारांकडे आणि उद्धव ठाकरेंकडे परत येतील अशा चर्चांना यामुळे पूर्ण विराम मिळाला असून शरद पवारांना आपले मित्र जयंत पाटील यांना पुरेशी मते मिळवून देता आलेली नाहीत आणि ठाकरेंना आपले निकटचे सहकारी मिलिंद नार्वेकरांना कोट्या इतकीही मते देता आलेली नाहीत, हे स्पष्ट झाले. त्याच वेळी महा विकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसलाही आपल्या किमान 8 ते 10 आमदारांना सांभाळता आलेले नाही हेही या निकालातून स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःची फक्त 103 मते होती व दहा अपक्ष लहान पक्षांचा त्यांना पाठिंबा होता. पण त्यांच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 26 हे पहिल्याच मतमोजणीत तर पाचव्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 14 मते अधिक नंतरच्या पेरीतील 11 मते पडून हे सर्वच विजयी झाले आहेत. भाजाप उमेदवारांनी पहिल्या पंसतीची तब्बल 117 मते मिळवली असून अजितदादा पवारांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 23 आणि 24 अशी 47 मते मिळाली. त्यांना शक्ती पेक्षा पाच मते अधिकची पडली आहेत. एकनाथ शिंदेंच्या दोन उमेदवारांना मिळून 49 मते पडली आहेत. त्यांच्याकडे स्वपक्षाचे 37 आमदार होते व काही अपक्ष लहान पक्ष त्यांच्या सोबत होते. त्यांनी शक्ती पेक्षा 11 मते अधिक घेतली आहेत. अर्थात शिंदेसोबत लहान पक्षाचे व अपक्ष असे दहा अन्य आमदार हे दोन वर्षांपासून, अगदी फाटाफुटीच्या पहिल्या दिवसापासूनच, रहिले. हे दहा वीर गोहातीलाही दिसले आणि नंतर गोव्यातही शिंदेंच्या चाळीस आमदारां समवेतच राहिले होते. महायुतीच्या नऊ विजयी उमेदवारां नंतर काँग्रेसच्या प्रज्ञा सताव यांना फक्त 25 मते पडली आहेत काँग्रेसकडे स्वतःची 37 मते होती. त्यातील काही त्यांनी मित्रपक्षांना देण्याचे ठरवले होते. नार्वेकरांकडे त्यांची सात गेल्याचे दिसते. खरेतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना 30 मते दिलेली होती. त्यांची पहिल्या पंसतीची मते कोट्यापेक्षा अतिरिक्त झाल्यानंतर त्यांची अधिकची मते दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला सर्वात प्रथम वाटली जावीत आणि महाआघाडीचे तीन्ही उमेदवार हे पहिलाय दुसऱ्या पेरीतच विजयी जाहीर व्हावेत अशी ती रणनीती होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. सातव यांना 25 मते पडल्याने तया विजयी क्रमात दुसऱ्या तिसऱ्या स्तानी गेल्या. भजापाच्या चार उमेदवारांची मते प्रत्येकी 26 भरल्यान तयांची दुसऱ्या पसंतीची मते आधी मोजली गेली व सदाभाऊ खोत विजयी जाहीर झाले. प्रज्ञा सातव यांच्या कोट्यातील पाच मते ही महायुतीकडे गेली असावीत असा निष्कर्ष पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे काढत आहेत. प्रत्यक्षात महायुतीपेक्षा ही अतिरिक्त मते ही मिलिंद नार्वेकरांच्या पारड्यात गेली का हाही प्रश्न काँग्रेसला सतावतो आहे. विधिमंडळाच्या कोपऱ्या कोपऱ्यात सुरु असणाऱ्या राजकीय चर्चांमध्ये हे जाणवतच होते की काँग्रेसची तीन मते ही अजितदादा पवारांकडे झुकलेली आहेत तर अन्य चार मते ही भाजपा तसेच शिंदेकडे झुकलेली आहेत. या सात आठ आमदारांची देहबोली, त्यांच्या गाठीभेटी हेच सांगत होत्या. अशोक चव्हाणांनी भाजपाची वाट धरली तेंव्हाच नांदेड परिसरताली चार आमदार त्यांच्या सोबत भाजपात जाण्याच्या तयारीत होते. पण रणनीती म्हणून भाजपाने त्यांना सोबत घेतले नव्हते. काँग्रेसमध्ये आत राहून हे आमदरा भाजपाला मदत कऱण्याची कामगिरी बजावतील हे जाणवत होते तसेच घडले आहे. शेकापचे जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या मतावंर तसेच काँग्रेसच्या मतांच्या आश्वसनावर भिस्त ठेवली होती. ते पहिल्या पंसतीच्या फक्त बारा मतांवरच थांबले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विरोध पाटील यंच्या नावाला होता करण मावळ आणि रायगडमद्ये शेकापने शिवसेना उमेदवारांना पुरेसी मदत केलेली नाही. तिथे अजितदादांचे निकटतम सहकारी सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. त्यामुळेच रायगडच्या शिवसेना नेत्यंच्या म्हणण्यानुसार ठाकरेंनी पाटील यांना पाठिंबा न देता मिलिंद नार्वेकरांना उभे केले. त्या खेळीत शरद पवारांचा एकमेव व मविआचा तिसरा उमेदवार मात्र पराभूत झाला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शरद पवारांच्या राष्र्ावादीचीही काही मते नक्कीच फुटलेली आहेत. कारण शेतकरी कामगार पक्षाचे स्वतःचे एक आमदार सभागृहात आहेत. त्यांनी न्कीच जयंत पाटील यंनाच मतदान केले. समाजवादी पक्ष, मार्कस् वादी पक्षाचे आमदार यांची मते नैसर्गिक मित्र या न्यायाने शेतकरी कामगार पक्षाकडे जाणे अपरिहार्य होते. त्यामुळे जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची किमान 17 ते 18 मते मिळायला हवी होती. डावे पक्ष हे सहसा कधीच इकडे तिकडे जात नसतात. त्यांच्या मतांची फाटफूट होण्याची शक्यता नसते. शरद पवारंनी सपाचे राष्रीलाय अध्यक्ष अखिलेश य़ांना फोन करून अबु आझमीना सांगितले होते की सपाच्या दोन्ही मतांवर मविआची भिस्त आहे. पण स्थानिक राजकारणत मुंबई मनपात सपाचे आमदार हे सातत्याने ठाकरे शिवेसनेच्या संपर्कात राहातात हे मुंबईकरांनी पाहिले व अनुभवले आहे. त्यांचे एक मत मिलिंद नार्वेकरांकडे गेले का याचा शोध शरद पवारांना व सपा नेत्यांना घ्यावा लागेल. त्याच बरोबर जयंत पाटील यांना अपेक्षे इतकी मते मिळालेली नाहीत तेंव्हा शरद पवारांचे काही आमदार हे अजितदादा व एकनाथ शिंदेकडे गेले का हेही त्यांना तपासून घ्यावे लागेल. या उलट उबाठाकडे स्वतःचे पंधरा व एक मित्र अपक्ष अशी सोळा मते होती. त्यांना काँग्रेसकडून काही मते अपेक्षित होती. ती सात मते मिळाली असे गृहित धरले तरी काँग्रेसची किमान आठ मते कुठे गेली हा संशोधनाचा विषय असून नाना पटोलेंसाठी पुढच्या काळात ती डोकेदुखी ठरणार आहे. शरद पवार गटाचे काही आमदार, काँग्रेसचे काही आमदार, तसेच बच्चु कडू ( 2), हितेंद्र ठाकूर ( 3), विनय कोरे (1) अधिक 11 अपक्ष अशी सारी मते ही महायुतीकडेच गेल्याचाही निष्कर्ष मतमोजणीच्या आकडेवारीतून निघतो आहे आणि आणखी तीनच महिन्यातं येणाऱ्या विधानसभा निवडणुकां संदर्भात मविआसाठी हा मोठाच धोका आहे.
