मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ९९ जागा जिंकत लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळवित विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला हरवीत सत्ता मिळवू असा संकल्प सोडला.राहुल गांधी यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी युथ काँग्रेसने कंबर कसली असून मुंबईतून नव मतदार नोंदणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कुलाबा कफ परेड येथून युवक काँग्रेसच्या मुंबई उपाध्यक्षा जिनत शबरीन यांनी महत्वाच्या नाक्यावर छोटे कॅम्प उभारीत १८ वर्षे वयाच्या नव मतदारांच्या मतदार नोंदणी अभियानाचा श्रीगणेशा केला.
देश भरात प्रत्येक युथ काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन संपर्क साधावा आणि नव मतदार युवांची मतदार नोंदणी अर्ज भरून घेऊन नोंदणी करावी असे आवाहन
राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू आणि राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत मुंबई प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी पुनीत परिया, मुंबई प्रदेश युवक अध्यक्ष अखिलेश यादव,कार्याध्यक्ष सुफियान हैदर,
दक्षिण मुंबई लोकसभा प्रभारी बिंदिया बॅनर्जी यांनी नव मतदार नोंदणी अभियानाची आखणी करीत मतदार नोंदणीच्या कामाला सुरुवात केली.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील कुलाबा विधानसभा मतदार संघापासून आरंभ करताना दक्षिण मुंबई युवक काँग्रेसच्या प्रोजेक्ट बॅलट सुरू करताना दक्षिण मुंबई प्रभारी बिंदिया बॅनर्जी यांच्या उपस्थितीत कफपरेड पोलीस स्टेशन समोर बूथ उभारून तेथे मतदार नोंदणी, मतदार नाव आणि पत्ता दुरुस्ती,मतदार ओळखपत्र आदी अर्जाचे वाटप करण्यात आले.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार आम्ही नवमतदार नोंदणी अभियान मुंबईत राबवित आहोत. त्याची सुरुवात कुलाब्यापासून करीत असल्याचे मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा जीनत शबरीन यांनी म्हटले.
