मुंबई :  राज्यात दिवसागणिक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कोयता गँग, चड्डी बनियान गँग आणि तलवार गँगने उच्छाद मांडला आहे. आज राज्यात ज्या तीन घटना घडल्यात या घटनेवरुन कायद्याचा धाक कुणाला राहिलाय की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये काही अज्ञातांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर नवी मुंबईत चड्डी बनियन गँगची दहशत पहायला मिळतेय. तर तिकडे डोंबिवलीमध्ये हातात तलवार घेऊन काहींनी दहशत परवलीये.

पनवेल तालुक्यात पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील चौघेजण फिरताना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झालेत.

डोंबिवलीमध्ये तलवार गँग सक्रिय झाली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस सुरूच आहे. डोंबिवलीतील आजदेपाडा परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भराडी माता इमारतीच्या आवारात काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले असता रहिवाशांनी आरडाओरडा केल्याने   चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.  चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाले असून चोरट्यांच्या हातामध्ये तलवारी दिसून येत आहेत. त्यामुळे डोंबिवली आजदेपाडा आजदेगाव आणि परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

पिंपरी- चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस सुरूच आहे. मध्यरात्री कोयता गँगचा टवाळखोरांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. तापकीर चौकाजवळ घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. त्या आधारे वाकड पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहे. याआधी सुद्धा कोयता गॅंगने अनेकदा वाहनांची तोडफोड केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *