ठाणे ः ठाण्यातील चंदनवाडीतील रुपादेवी मंदिरासमोर जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे (शहर) जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच असंघटित कामगार सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राजु चापले, रुपाली चापले आणि राजेश जगन्नाथ साटम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार आणि रविवारी मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास विभागातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास भाई देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, मिलिंद भाऊ बनकर, रचना ताई वैद्य, कैलास हावळे, गजानन चौधरी, आशिष खाडे, ठाणे शहर विधान सभा अध्यक्ष महेंद्र पवार, दिपक क्षत्रिय, विक्रांत घाग, प्रदिप साटम, सुनिल कुर्हाडे, राजेश कदम, मयुर पाटील, किरण जेधे, माधुरी सोनार, वैभव खोत, रितेश मोहंती, सुनिल गुरव , साहिल उदुगाडे, रोहित चापले, कुणाल चापले तसेच पक्षाचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते यांनी शिबिरास भेट दिली.
00000
