साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनीमादींग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी व वैदयकीय पदवी अभ्यासक्रमांतर्गत ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांकडून “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. जेष्ठता व गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यास निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला (leaving certificate), मार्कशिटस, 2 फोटो व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इत्यादी सह २ प्रतीत अर्ज सादर करावा. अर्जामध्ये स्वतःचा पूर्णपत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा.
अर्ज जिल्हा व्यवस्थापक, ठाणे यांचे कार्यालय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा मजला, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, सहयाद्री शाळेच्या बाजूला, खारेगाव, कळवा (प.), ठाणे- ४००६०६ येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत दि.२५ जुलै २०२४ पर्यंत सादर करावेत, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (म.) ठाणे जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी कळविले आहे.
00000
