मुंबई :
एजीस लॉजिस्टिकचे किरण तरे यांना युनियनच्या प्रयत्नाने तीन लाख रुपयांची मदत करण्यात आली. मुंबईमधील माहुल येथील एजीस लॉजिस्टिक ही एक नामवंत मल्टीनेशनल कंपनी असून,  माहुल येथील काम करणाऱ्या कामगारांचे सेवाशर्ती व पगारवाढ इत्यादीचे प्रश्न  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचेअध्यक्ष  ॲड. एस. के.  शेट्ये यांच्या  मार्गदर्शनाखाली विद्याधर राणे आणि विकास नलावडे हे पाहतात. किरण तरे हे गेली अडीच  वर्षे आजारीअसल्याने कामावर येत नव्हते. कंपनीचे उपाध्यक्ष श्री. गिरीश गुरखे, जनरल मॅनेजर प्रवीण जांगडे यांच्यासोबत युनियन पदाधीकाऱ्यांची बोलणी होऊन किरण तरे याना त्यांच्या गैरहजर कालावधीचा पंगार त्यांच्या रजेमध्ये एडजस्ट करून त्यांचा ऐच्छिक सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला. या व्यतिरिक्त  त्याना तीन लाख रुपये विशेष अर्थसहाय्य देण्यात आले. ॲड. एस. के. शेट्ये आणि विद्याधर राणे यांच्या विनंतीला  गिरीश गुरखे , प्रविण जांगडे  यांनी सहानुभूतीपूर्वक व  सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीमधील युनियनचे प्रतिनिधी जयेश तावडे, एम . एच. साखरे, डी. एल. बोराडे व इतर कामगार प्रतिनिधीनी यासाठी यूनियनपर्यंत श्री. तरे यांचे प्रतिनिधित्व केले. याबाबत श्री. तरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *