प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण

 

 

ठाणे: डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या एकूण आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात ( दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन ) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर उर्वरित टप्प्यांचे काम देखील जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण, डोंबिवली सह आसपासच्या शहरातील वाहतूक जलदगतीने करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *