नोंद

डॉ. अनिल आठल्ये

अलिकडेच विरोधी पक्षनेत्यांनी संसदेमध्ये स्वत:ला हदू म्हणवणारे हसक प्रवृत्तीचे आणि दुसऱ्याचा द्वेष करणारे असल्याचे विधान केले. गेल्या काही वर्षांपासून हदू दहशतवादाचा सिद्धांत ऐकण्याची सवय झालेल्यांना या विधानाचे आश्चर्य वाटणार नाही. मात्र या विधानाचा भारतातील हदूंवरच नव्हे तर परदेशस्त हदू समाजावर नेमका काय परिणाम होईल, याचेही भान राखणे गरजेचे आहे. अन्यथा, परिणामांची जबाबदारी त्यांचीच असेल.

नव्या लोकसभेत दोन जुलै रोजी विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, जे लोक स्वत:ला हदू म्हणतात ते हसक आणि इतरांचा द्वेष करणारे आहेत. त्यांनी हसाचार आणि इतरांचा द्वेष याचा हदूधर्मीयांशी सरळ संबंध जोडला. नंतर सारवासारव करत हे विधान फक्त संघ परिवाराबाबत म्हटल्याची पुस्ती त्यांनी जोडली. मुळात ‌‘हदू दहशतवाद‌’ हा सिद्धांत नवा नाही. 2008 मध्ये तत्कालिन गृहमंत्र्यांनीही असेच वक्तव्य केले होते. ‌‘विकीलिक्स‌’नुसार राहुल गांधी यांनी मागे अमेरिकन राजदूताला सांगितले होते की, भारतापुढे खरा धोका हदू दहशतवादाचा आहे. त्याच वर्षी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा त्या सर्व पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या हातावर केशरी गंडा बांधला होता. अर्थातच त्यामागे स्वत:ला हदू दाखवण्याचा प्रयत्न होता. मुंबई पोलिसांचे तुकाराम ओंबळे यांनी शौर्याची पराकाष्ठा करुन एका दहशतवाद्याला जिवंत पकडले. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला हदूंनी केला, असे दाखवण्याचा प्रयत्न फसला. परंतु, त्यानंतर मुंबई पोलिसांच्या माजी अधिकाऱ्याने एक पुस्तक लिहून त्यात पुन्हा एकदा हे असत्य ठसवण्याचा प्रयन केला. त्यानंतर हदूंच्या सुदैवाने अमेरिकेमध्ये डेव्हिड हेडली आणि राणा हे दोघे दहशतवादी पकडले गेले. आज हे दोघेही अमेरिकेतील तुरुंगात आहेत. 26 नोव्हेंबरचा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी केला असे मानायचे झाले तर मग डेव्हिड हेडले आणि राणा हेदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत का, हा प्रश्न उरतो. हदूंना दहशतवादात गोवण्याचा हाच प्रकार भारताच्या इतिहासात14 वर्षांनंतर परत केला जात आहे.
जगभरात जवळपास तीन कोटी भारतीय असून त्यातील बहुतांश हदूधर्मीय आहेत. मात्र ते त्या त्या देशात अप्रवासी भारतीय म्हणून रहात आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये त्यांची मोठी संख्या आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या देशांमध्ये पाकिस्तानी तसेच इतर भारतविरोधी शक्तीनी हदूद्वेष पसरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून या सर्व देशांमध्ये हदूंच्या मंदिरांवर हल्ले झाल्याचे वास्तव आहे. याउलट यापैकी कोणत्याही देशामध्ये हदूंनी इतरांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले केल्याचे एकही उदाहरण दिसत नाही. असे असूनदेखील पाकिस्तान आणि काही ख्रिश्चन अतिरेकी संघटनांनी हदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.
गेल्या 20-30 वर्षांचा संपूर्ण जगाचा इतिहास पाहिला तर त्यात कुठेही हदूधर्मीयांनी दहशतवादी हल्ले, बाँबस्फोट, विमानांचे अपहरण करणे अशा कृत्यांमध्ये सहभाग घेतल्याचे दिसत नाही. असे असूनही शांतताप्रिय हदूंना दहशतवादी ठरवण्याचा हा प्रयत्न नदनीय आहे. यामुळे त्या प्रदेशात राहणाऱ्या हदूंवर हल्ले करणाऱ्या शक्तीना बळ मिळणार आहे. भविष्यात हदूंच्या मंदिरांवर कवा हदूंवर हल्ले झाल्यास हे लोक लोकसभेतल्या त्या भाषणाकडे बोट दाखवतील आणि हदूविरोधी हल्ल्याचे समर्थन करतील. भारतातीलच एका प्रमुख राजकीय नेत्याने हदू दहशतवादी आहेत, असे म्हटल्याने त्यांच्या या हसक कारवायांना एक प्रकारे समर्थनच मिळणार आहे.
भारतामध्ये, विशेषत: गोहत्येच्या संदर्भात अनेकदा झुंडबळी गेले असल्याचे वास्तव आहे. परंतु, बहुसंख्य हदूंनी या हसाचाराचे कधीच समर्थन केलेले नाही. गेल्या 75 वर्षांचा देशाचा इतिहास बघितला तर इतर धर्मीयांना जबरदस्तीने हदू बनवण्याची एकही घटना घडलेली दिसत नाही. आजसुद्धा भारतात हजला जाणारे यात्रेकरू कवा अजमेर दर्ग्याला भेट देणाऱ्या लोकांवर हल्ले झाल्याचे कोणीही ऐकलेले नाही. याउलट, हदूंच्या अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रेवर आजपर्यंत अनेक वेळा हल्ले झाले आहेत. अमरनाथ यात्रेकरुंच्या रक्षणासाठी लाखो सैनिक आणि पोलीस तैनात करावे लागतात, हे वास्तव आहे. तरीदेखील हदूद्वेषाने पछाडलेल्या राजकारण्यांना हदूच दहशतवादी वाटतात, ही एक विडंबनाच म्हणावी लागेल.
याला मुख्य कारण म्हणजे अनेक इतिहासकारांच्या मते, संपूर्ण हदू समाज इतका दुभंगलेला आहे की त्याला याविरुद्ध आवाज उठवावासा वाटत नाही. 500 वर्षांनंतर अयोध्येमध्ये श्रीरामाच्या जन्मस्थानी त्यांचे मंदिर बांधले गेले. त्यालादेखील प्रत्यक्ष अयोध्यावासियांचाच विरोध असल्याचे गेल्या निवडणूक निकालाने दाखवून दिले. अर्थातच अयोध्यावासियांच्या या वर्तनाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर ते सीतेला घेऊन अयोध्येला परतले तेव्हा याच अयोध्यावासियांनी सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यामुळे श्रीरामांना सीतेचा त्याग करावा लागला, हे वास्तव आहे. आज तेच अयोध्यावासी मंदिरातून श्रीरामांना परत तंबूमध्ये पाठवायला मागे-पुढे पाहणार नाहीत. हा हदूंचा इतिहास आहे.
काशीमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतरही तेथील हदू पंतप्रधानांवर नाखुश आहेत. इतिहासात डोकावून बघितले तर या नाराजीमागील दाखलाही मिळतो. 1750 मध्ये मराठ्यांनी दिल्लीपर्यंत मुसंडी मारली होती. तेव्हा मल्हारराव होळकर 40 हजार घोडदळ घेऊन काशीला पोहोचले होते. मल्हारराव होळकर स्वत: शिवभक्त होते. त्यांनी काशीतल्या लोकांना संदेश पाठवला की विश्वेश्वराचे देऊळ पाडून औरंगजेबाने बांधलेली मशीद आता नष्ट करुन पुन्हा एकदा तिथे मंदिर प्रस्थापित केले जाणार आहे. तेव्हा काशीच्या लोकांनी घाबरुन मल्हारराव होळकरांकडे एक प्रतिनिधी मंडळ पाठवले. त्याचे नेतृत्व मोरो दीक्षित नावाच्या मराठी माणसानेच केले होते. त्यांच्याकरवी काशीवासियांनी मल्हाररावांना गळ घातली की, त्यांनी ज्ञानवापी मशिदीला हात लावू नये, कारण तसे झाल्यास तुम्ही गेल्यानंतर इथले मुसलमान आमचा छळ करतील. काशीवासियांचे हे म्हणणे ऐकून मल्हारराव होळकरांनी काशीविश्वेश्वर मंदिर पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न सोडून दिला. ही काही कपोलकल्पित घटना नव्हे. या घटनेचे अस्सल ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. अर्थातच आपल्या लोभापायी श्रीराम वा सीतामाईला छळले गेले, तिथे इतरांचा काय पाड लागणार?
हा सर्व ज्ञात आणि अज्ञात इतिहास सर्वसाधारण लोकांना माहिती नसल्याने इतिहासाच्या पुनरावृत्तीचा धोका संभवतो. अशा खटाटोपीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एक महाशक्ती म्हणून उभा राहू नये, हेच मुख्य सूत्र दिसते. आज जगात भारत आर्थिकदृष्ट्या तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. लष्करीदृष्ट्याही तो आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. यामुळे भविष्यात चीनप्रमाणेच भारतदेखील पाश्चिमात्यांच्या मक्तेदारीला आव्हान देईल, अशी भीती त्या देशांना वाटते. हे थांबवण्यासाठी भारतामध्ये आपापसातला कलह आणि बहुसंख्य लोकांना दहशतवादी ठरवून जागतिक स्तरावर भारताचा उदय रोखण्याचा हा प्रयत्न आहे. दुर्दैवाने स्थानिक राजकारणात कुरघोडी करण्यासाठी हदू समाजाला विघटित तसेच बदनाम करणे हाच एकमेव कार्यक्रम काही राजकीय पक्षांपुढे आहे.
मुघल सत्ता शिखरावर असताना महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली देशाला हदवी स्वराज्याचा विचार दिला. त्यामुळे इराण, तुर्कस्तान, स्पेन यासारख्या देशांप्रमाणे भारताचे इस्लामीकरण होऊ शकले नाही. आज भारताची प्राचीन संस्कृती आणि धर्म जिवंत असण्यास शिवप्रभूंचे हदवी स्वराज्य आणि मराठीजनांचे शौर्य कारणीभूत आहे. परंतु, अशी नररत्ने हजारो वर्षांमध्ये एकदाच जन्म घेतात. आज देशापुढे असणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी याच तोडीच्या नेतृत्वाची गरज आहे. आज जगात संगणक आणि प्रसारमाध्यमांमुळे अत्यंत वेगाने माहितीची देवाणघेवाण होते. त्याचे काही फायदे जरुर आहेत. परंतु, त्याचप्रमाणे हदूविरोधात अशा प्रकारची वक्तव्ये आणि मिथके जगभर पसरण्याचा मोठा धोकाही आहे. याचा परिणाम म्हणून भविष्यात परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर दहशतवादी हल्ले वाढले तर नवल वाटणार नाही. अर्थातच त्याचे पाप अशी बेजबाबदार वक्तव्ये करणाऱ्यांच्या माथीच पडेल.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *