नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बाजार परिसरात दररोज लाखोंच्या घरात मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते, मात्र बाजारातील अंतर्गत भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाला अडथळे निर्माण होत आहेत. मसाला बाजारात चक्क राडारोडा टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार सुरू आहे.
एपीएमसीतील सर्व बाजारात खड्डे आहेत, मात्र धान्य आणि मसाला बाजारात मोठे खड्डे पडले आहेत. पावसात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असते.
बाजारातील अंतर्गत भागात बहुतांशी रस्त्यावर मोठाले खड्डे पडलेले आहेत. त्याची तात्पुरती डागडुजी म्हणून चक्क राडारोडा टाकून खड्डे बुजवले जात आहेत. मसाला बाजारातील इ आणि एफ या गल्लीमध्ये मोठे खड्डे पडले आहेत.
00000
