नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येणा-या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांकरिता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दि. 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेले आहेत, अशा लाभार्थ्यांची योजनेच्या अटी / शर्तीनुसार पडताळणी करण्यात आलेली आहे.
त्यास अनुसरून शिष्यवृत्ती योजनेकरिता ज्या लाभार्थ्यांनी योजनेच्या अटी / शर्तींनुसार परिपूर्ण अर्ज सादर केलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांना यापुर्वीच लघुसंदेशाच्या (SMS) माध्यमातून कळविण्यात आलेले आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांनी अदयापपर्यंत सदर कागदपत्राची पूर्तता केलेली नाही, अशा लाभार्थ्यांना सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात येत आहे.
त्यानुसार ज्या लाभार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने याबाबत पडताळणी करावी व लघुसंदेशामध्ये (SMS) नमूद केलेल्या सूचनेनुसार कागदपत्रांची पूर्तता दि. 26 जुलै 2024 पर्यंत करुन अर्ज पुन:श्च सादर करावा. तरी या दिनांकापर्यंत प्राप्त होणा-या अर्जांची पडताळणी करुन लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येईल, तसेच जे लाभार्थी कागदपत्रांची पूर्तता दिलेल्या मुदतीमध्ये करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरवून निकाली काढण्यात येतील, याची कृपया नोंद घेण्यात यावी असे नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *