मुंबई : २३ जुलै रोजी लोकमान्य टिळकांची १६८ वी जयंती आहे. भारतीय स्वातंत्र्याचे जनकाचे ऐतिहासिक समाधी स्थानामुळे पुनित झालेल्या गिरगाव चौपाटीचे २०१५ साली स्वाराज्यभूमी असे नाव शासनाने जाहिर केले. २०२४ मधे शासनाने नामफलकाचे उद्घाटन केले. नामफलकाच्या उद्घाटनानंतर लोकमान्य टिळक जयंतीचे हे पहिलेच वर्ष!
स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लोकमान्य टिळकांनी लढा दिला परंतु त्यांना स्वातंत्र्य पाहता आले नाही, म्हणून प्रती वर्षी त्यांच्या जयंती व पुण्यतिथीला येथे कृतज्ञता भावनेने ध्वजारोहण केले जाते. लोकमान्य टिळकांनी खगोलशास्त्रावर आधारित ओरायन हा अजरामर ग्रंथ लिहिला. म्हणून आम्ही प्रसिद्ध गणितज्ञ जयंत नारळीकर यांचे शिष्य व नेहरु तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांना ध्वजारोहणासाठी आमंत्रित केले, त्यांनी आमंत्रण स्वीकारले.
स्वराज्यभूमी ( गिरगाव चौपाटी ) येथे मंगळवार , दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ठीक १० वाजता ध्वजारोहण होणार आहे. सर्वांनी सकाळी दहा पुर्वी उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे आयोजक लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समिती करीत असुन व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिका ड विभाग करीत आहे.
