मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदार व विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्यावतीने गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीराचे संपूर्ण नियोजन उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांनी केले होते.
या महारक्तदान शिबीराचे उद्घाटन दक्षिण मुंबईचे ंखासदार तसेच शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत तसेच माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी केले.
या महारक्तदान शिबीरात मुंबईतील के.ई.एम.रूग्णालय, सायन रूग्णालय,नायर रूग्णालय आणि वाडिया रूग्णालय आदि रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या.मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असूनसुद्धा एकुण ९३४ रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला त्यापैकी ८५७ रक्तदाते रक्तदान करण्यात यशस्वी झाले.या सर्व रक्तदात्यांना बोरोसील कंपनीची इस्त्री भेट देण्यात आली होती.
या शिबीराला मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव,राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक बबन कनावजे,इंदिरा काँग्रेस पक्षाचे गोरख कांगणे,समाजवादी पार्टीचे साजिदभाई तसेच शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर आदिंनी सदिच्छा भेट दिली. त्याचबरोबर सर्व माजी नगरसेवक रमाकांत रहाटे,दत्ता पोंगडे,अनिल कोकीळ,सचिन पडवळ,सिंधू मसूरकर,सौ.लता रहाटे,सौ. वैभवी चव्हाण सौ.श्वेता राणे तसेच सौ.गौरी चौधरी,सौ. रूपाली चांदे,सौ.दिव्या घाडीगावकर,पवन जाधव,सुप्रित म्हात्रे,श्रृती पोटले,शार्दुल म्हाडगुत
या शिवसेना पदाधिका-यांसोबत सर्व आजी -माजी पदाधिकारीही याप्रसंगी उपस्थित होते.
सदर महारक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख विजय इंदुलकर,किरण तावडे, मिनार नाटाळकर,जयसिंग भोसले,बैजू हिंदोळे आदिंनीं रक्तदाते आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *