मुंबई : मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया (गर्डर) उभारण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. शनिवारी रात्रकालीन घेतलेल्या ब्लाॅकवेळी ५७ मीटर लांबीचे विशेष पोर्टल बूम उभारण्याचे आणि जुने अँकर हटविण्याचे काम करण्यात आले.मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मशीद स्थानकादरम्यान दीडशेहून अधिक वर्ष जुना कर्नाक उड्डाणपूल सप्टेंबर २०२२ मध्ये पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर, पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, गेल्या शनिवारी मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात आला होता.
या ब्लाॅकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद करण्यात आली होती. तसेच इतर लोकल, रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. या ब्लॉक कालावधीत एकाच वेळी तीन रेल्वे क्रेनचा वापर करून हार्बर मार्गासह मुख्य धीमा आणि जलद मार्गावरील दोन जुने अँकर पोर्टल्स काढून टाकण्यात आले. ५७ मीटर लांबीचे आणि १० ट्रॅक कव्हर करणारे नवीन पोर्टल मध्य रेल्वेने उभारून आतापर्यंतच्या सर्वात लांब पोर्टलपैकी एक आहे. मध्य रेल्वेने मशीद आणि सीएसएमटीदरम्यान ५३ मीटरचे दोन पोर्टल उभारले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *