मुंबई : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २३ जुलै २०२४ या दिवशी आरसा गेट, मंत्रालय येथे भोजन सुट्टीत निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत.
यापूर्वी संघटनेच्या वतीने २५ जुलै या दिवशी आझाद मैदान येथे भव्य मोर्चा आयोजित कऱण्यात आला होता, परंतु मुख्यमंत्री कार्यालयातून कार्यवाही होत असल्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे पण आपल्या मागण्यांबाबत कर्मचारी संतप्त असून त्यांची तीव्र निदर्शने मंत्रालयाच्या आरास गेटवर २३ जुलैला दुपारीच्या जेवणाच्या सुट्टीत होतील, अशी माहिती राज्य कर्मचारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *