मुंबई ५ असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने कै दशरथ येलवे यांच्या स्मरणार्थ ३२ वी जुनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा एम. सी. ए. ट्रेनिंग सेंटर, सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर, पश्चिम रेल्वे प्लेट फॉर्म क्रमांक ५ व व सेंट्रल रेल्वे प्लेट फॉर्म क्रमांक ८ च्या मध्ये, शंकर मंदिराच्या बाजूला, दादर, मुंबई – २८ येथे आयोजित करण्यात आली आहे. १८ वर्षंखालील मुले व मुली तसेच २१ वर्षाखालील मुले व मुली अशा चार गटांमध्ये हि स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतून ५८ व्या जुनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी आपल्या क्लब मार्फत आपली नावे दिनांक २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान वरील पत्त्यावर नोंदवावीत. अधिक माहितीसाठी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सह सचिव संजय बर्वे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९१३७५७८९७८ वर संपर्क साधावा.
०००००
