राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाली.
00000
