ठाणे : प्रवासी मिलिंद साळवी यांचे पैशाचे पाकीट एसटीचे सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांनी त्यांना संपर्क करून परत केले आहे
शुक्रवार दि १९ ला मध्य रात्री कोल्हापूर ठाणे ही एसटी प्रवाशांना वंदना एसटी स्टँडवर सोडुन आगार क्रमांक २ येथे नेहमी प्रमाणे आली दैनंदिन कामाचा भाग म्हणून प्रवास करुन आगारात आलेल्या गाडीची सफाई कर्मचाऱ्याकडून साफसफाई केली जाते ..ठाणे आगार क्रमांक २ येथील सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड सदर गाडीची सफाई करत असताना गाडीत मिलिंद साळवी या प्रवाशाचे पैशाचे पाकीट पडल्याचे आढळले ..सदर पाकिटात ३ ते ४ हजाराची रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती. मिलिंद साळवी यांचे पैशाचे पाकीट सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांनी त्यांना संपर्क करून परत केले आहे ….
सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे …सदर प्रवाशाने याबाबत सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांचे व लाल परी बाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तीन ते चार हजार ही काही फार मोठी रक्कम नाही पण एसटी तील कर्मचाऱ्यांचा पगार पहाता सफाई कर्मचाऱ्यांसाठी तीन ते चार हजार रुपये ही मोठी रक्कम आहे. मोतीलाल राठोड पाकीटातील पैसे सहजपणे ठेऊ शकले असते पण त्यांनी या मोहाला बळी न पडता एसटी चा कर्मचारी प्रामाणिक आहे याची.. जरी वरकरणी छोटी वाटणारी गोष्ट असली तरी.. आपल्या प्रामाणिक पणाची प्रचिती देऊन जनमानसात लालपरीची प्रतीमा उंचावण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे.
0000
