चाकण आणि खोपोलीतील ५२ महिलांना व्यवसाय, संवाद आणि नेतृत्व कौशल्यांचे प्रशिक्षण.
मुंबई : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि भारतातील सर्वात मोठे विकास ‘ए’ ग्रेड प्राप्त औद्योगिक रिअल इस्टेटचे व्यवस्थापक इंडोस्पेस यांच्या संयुक्त विद्यमाने चालवलेल्या ‘यंग वुमन फेलोशिप प्रोग्राम’ (वायडब्लूएफपी – YWFP) ग्रामीण महाराष्ट्रातील ५२ महिलांच्या पहिल्या गटाने पदवी प्राप्त केली.
या महिलांची निवड इंडोसेपसचे दोन मोठे लॉजिस्टिक पार्क असलेल्या महाराष्ट्रातील चाकण आणि खोपोली परिसरातून निवड करण्यात आली होती.
इंडोस्पेसमधील ‘यंग वुमन फेलोशिप प्रोग्राम’चा उद्देश, निवडलेल्या गटातील प्रत्येक स्त्रीला जीवन कौशल्ये, उद्योजकीय ज्ञान आणि नेतृत्व कौशल्याद्वारे आत्मनिर्भर होण्यासाठी आणि त्यांच्या समुदायाच्या बदलाचे प्रतिनिधीत्व करणे हा आहे.
सदर फेलोशिप प्रोग्रॅमसाठी उमेदवारांची नीवड ठराविक प्रक्रियेदवारे केली जाते. या प्रोग्राममध्ये व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय कौशल्य कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचा समावेश होता.यामध्ये महिलांना प्रॅक्टिकल टास्क, कम्यूनिटी लीडरशिप प्रोजेक्ट तसेच नवीन व्यवसाय उभारणीचे तंत्र इत्यादि बाबींची ट्रेनिंग दिली जाते.
पदवीधर तरुणींचा इंडोस्पेसच्या व्यवस्थापनाकडून सत्कार करण्यात आला आणि त्यांना प्रमाणपत्रे तसेच व्यवसायासाठी आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले.
‘इंडोस्पेसमध्ये आमचा विश्वास आहे की, महिलांना सक्षम बनवणे ही केवळ नैतिक गरज नाही तर तो आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आमचे महिला सक्षमीकरण प्रकल्प हे शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि समुदाय विकासावर लक्ष केंद्रित करून कायम स्वरुपी प्रभाव निर्माण करण्याच्यादृष्टीने तयार केलेले आहेत’, असे मत द एव्हरस्टोन ग्रुप चे उपाध्यक्ष राजेश जग्गी यांनी व्यक्त केले.
‘वायडब्यूएफपी सारख्या प्रकल्पांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करून, आम्ही संरचनात्मक अडथळे दूर करण्यात आणि सर्वसमावेशक तसेच समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणातील आमचे प्रयत्न केवळ वैयक्तिक यशोगाथा नसून समाजात परिवर्तन घडवून आणणारे आहेत’, असेही श्री. जग्गी पुढे म्हणाले.
यावेळी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे ग्लोबल सीईओ जयंत रस्तोगी म्हणाले, की, ‘यंग वुमन फेलोशिप प्रोग्रामद्वारे महिलांचे सक्षमीकरण हे आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. महिलांना आवश्यक जीवन कौशल्ये, उद्योजकीय ज्ञान आणि नेतृत्व कौशल्याने सुसज्ज करून, आम्ही स्वावलंबनाला चालना देत आहोत. त्यांना त्यांच्या समुदायांमध्ये बदलाचे उत्प्रेरक बनण्यास सक्षम करत आहोत. इंडोस्पेस सोबतच्या आमच्या सहयोगी प्रयत्नातून, महिलांनी त्यांचा उद्योजकीय प्रवास यशस्वीपणे सुरू केला आहे आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी सामुदायिक प्रकल्प राबवले आहेत, हेच या उपक्रमाचे सखोल परिणाम दर्शवितात.’
0000
