ठाणे : श्री तारा माँ मिशनद्वारा `गुरु पूर्णिमेचा भव्य मंगल सोहळा श्री माँ वनस्थली आश्रम व श्री माँ हॉल, पातलीपाडा येथे साजरा करण्यात आला.
वनस्थली आश्रमात सकाळी ५ वाजता ॐकार, भजन, आरतीने गुरुपूर्णिमेच्या मंगल कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री शिर्डी साईबाबा मंदिरात व ब्रह्मलीन परमपूज्य श्री स्वामी ॐकारानंद समाधी मंदिरात अभिषेक व आरती झाल्यानंतर श्री सिद्धीविनायक मंदिर परिसरात हवनाचा कार्यक्रम सिद्ध झाला.
श्री माँ भव्य सभागृहात भजन व मधुर भक्ति गीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. नंतर दिव्यस्वरुपी सद्गुरु श्री तारा माँ यांचे गुरुमहात्म्यावर सुश्राव्य प्रवचन झाले. दर्शन महाप्रसादानंतर कार्यक्रम संपन्न झाला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *