मुंबई : भास्कर कॉलनी येथील मा. नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या कार्यालयात ‘नवमतदार नोंदणी’ तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’  यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास सन्माननीय कृषिमंत्री दादा साहेब भुसे महाराष्ट्र राज्य यांनी सदिच्छा  भेट दिली. सदर शिबिरात नवमतदार नोंदणी, मतदार यादी , नाव पत्ता दुरस्ती तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा मा. नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी व युवा मोर्चा सचिव हिमांशू राजपूत यांनी केले. यावेळी ‘भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले साहेब’  तसेच सागर भदे व निशिकांत महांकाळ यांनी भेट दिली, सदर उपक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *