ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात `माझी वसुंधरा ग्रीन वसुंधरा’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एनसीसी स्काऊट गाईड एन्व्हायरमेंटल क्लब आणि रोट्रॅक्ट क्लब च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या 50 झाडांची लागवड रघुनाथ नगर, ठाणे येथील रायलादेवी तलाव परिसरात केली. ‘टू मेक प्लॅनेट अर्थ लिव्हेबल’ अशा घोषणा देऊन आपण लावलेल्या झाडांना जगवण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच निसर्गाशी जवळीक साधून वर्षाऋतूचा आनंद देखील लुटला.
या वृक्षारोपण प्रकल्पामध्ये उपप्राचार्या सौ. दीपिका तलाठी, पर्यवेक्षक सागर जाधव, प्रा. धनश्री गवळी, प्रा. लीना रासकर, प्रा. हर्षदा पांचाळ, प्रा. अनुपमा व स्मिता खराडे मॅडम उपस्थित होते.
