विलेपार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या

 

मुंबई : प्रबोधनकार क्रीडा संकुलातील जलतरणपटू दुर्वेश देवरुखकर याने नुकत्याच पुणे येथील टिळक टॅंक येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये ग्रुप ३ मध्ये सहभागी होऊन तीन रौप्य व एक कांस्य पदके पटकावले. त्याची पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली असून तेही तब्बल तीन प्रकारात (१०० मी बटरफ्लाय, १०० मी ब्रेस्टस्टोक व २०० मी इंडिव्हिज्युअल मीडलि ) दुर्वेश हा प्रबोधनकार क्रीडा संकुलाचे माजी महापौर रमेश प्रभू यांच्या आशीर्वादाने तसेच संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू व सचिव डॉ. मोहन राणे यांच्या मार्गदर्शनाने वयाच्या चार वर्षापासून जलतरणाचा सराव करत आहे. त्याने आतापर्यंत बऱ्याच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये नवीन विक्रम करून वैयक्तिक विजेतेपद पटकावले आहे. दुर्वेशी मोठी बहीण सिया हिला सुद्धा या स्पर्धेत ८०० मी फ्री स्टाईल मध्ये कांस्य पदक मिळविले आहे तसेच ती स्वतः या आधी चार वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळून पदक विजेती ठरली आहे. नील जेटली, सावली पाटील व अर्चित परब या संकुलाच्या खेळाडूंनी सुद्धा रिले शर्यतीत सुवर्ण पदक पटकाविले आहे. सर्व खेळाडूंच्या यशापाठी संकुलाचे प्रमुख प्रशिक्षक सहदेव नेवाळकर यांचा देखील मोलाचा वाटा आहे. दुर्वेश आता ६ ते ११ ऑगस्ट रोजी भुवनेश्वर ओडीसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पोहण्याच्या तीन प्रकारात सहभागी होणार आहे. हा पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मीडियम मध्ये इयत्ता सहावीत शिकत आहे. रोज सकाळी दोन आणि सायंकाळी तीन असा एकूण पाच तासांचा त्याचा रोजचा सराव करत असतो व त्याचबरोबर तो त्याचा अभ्यास देखील खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो. दुर्वेश ची आई इशा देवरुखकर आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच आहे आणि वडील गणेश देवरुखकर हे मल्लखांबातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. या दोघांच्या अनुभवाचा देखील दोन्ही बहिण भावाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *