मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणूकीत सत्तेचा फॉर्म्युला आज जाहिर केला. कुणाशीही युती न करता मनसे यंदा २२५ जागा लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहिर केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच, हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. ते मुंबईत बोलत होते.

आजच खूप पाऊस पडतोय त्यामुळे अनेक जण येऊ शकले नाहीत. गेले 20 25 दिवस परदेशात होतो. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतंम, तिथे इंटरव्हायू झाला. तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला, आग्रह केला. मला म्हटला तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलेय. तिकडे जाऊन मी खरंच थक्क झालो.  तिकडे दीड ते दोन तासाचे वेटिंग होते.  असंख्य लोकं मला तिकडे भेटले.

कॅनडा आणि अमेरिकेत पाच तलाव आहेत, ते अवकाशातून दिसतात, त्यात नायगरा फॉल्स दिसतो. मुबलक पाणी तिकडे असून कागदाचा वापर करतात. आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असूनही वारेमाप पाणी वापरलं जातं.

आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल. कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, पैसे काढणाऱ्यांना तिकीट नाही. जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकं मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत. काही लोकं हसतील, पण ती गोष्ट घडणारच.  आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोतॉ. कोणतीही युती नाही. 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. यावेळी मी बैठका घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

येत्या दोन दिवसात दुसऱ्या सर्व्हेला आपले नेते येतील. निवडणुकीच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *