ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे यांच्याकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे . यानिमित्ताने वृक्षारोपणाचा भव्य सोहळा शहापूर तालुक्यातील विविध गावांत साजरा करण्यात आला. यावेळी सुमारे २००० झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली. शहापूर तालुक्यातील मौजे भरई, धसई व बामणे या गावांत वृक्ष लागवड व शाळकरी मुलांना एक मूल एक झाड असे वृक्ष वाटप करून वृक्षरोपण सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या मध्ये शाळकरी मुलांसाठी झाड दत्तक योजना जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष अभ्यंकर यांनी शाळकरी मुले ग्रामस्थ व महाराष्ट्र शिक्षक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उद्देशून वृक्ष रोपणाचे मानवी संस्कृतीच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व विशद केले. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांशी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याची गरज या विषयावर प्रश्नोत्तर सत्र व मार्गदर्शन करून वृक्ष लागवडीची गरज त्यांच्या बालमनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. मागील दोनशे वर्षात झालेल्या प्रचंड वृक्षतोडीमुळे जागतिक उष्मा वाढ व हवामान बदलाने मानवी जीवन व एकूणच निसर्ग यांच्यावर झालेला विपरीत परिणाम विद्यार्थ्यां लक्षात आणून त्यांना जास्तीत जास्त लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक नितीन चौधरी, कल्याण विभागीय अध्यक्ष जगदीश भगत,कोकण कार्याध्यक्ष विलास अँग्रे, कोकण कायदेशीर सल्लागार व ठाणे अध्यक्ष संतोष गायकवाड, कमवि सरचिटणीस मुंबई विभाग मंगेश पाटील, वृक्षारोपण ठाणे जिल्हा समन्वयक सचिन जाधव,ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी निचीते,ठाणे जिल्हाध्यक्ष पाटील, माध्य / शहरी, ठाणे जिल्हाध्यक्ष माध्य / शहरी भगवान गावडे, ठाणे जिल्हाध्यक्ष, प्राथ. प्रमोद पाटोळे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्राथ. नवनाथ पवार, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यमाध्यद्ध नरेंद्र शिंदे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यमाध्यद्ध तुकाराम खाटेघरे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष यमाध्यद्ध प्रकाश फर्डे, भिवंडी तालुकाध्यक्ष यप्रायद्ध रविंद्र तरे, ठाणे जिल्हा सचिव यमाध्यद्ध श्री दिलीप चौधरी, शहापूर तालुका अध्यक्ष यमाध्यद्ध श्री धनाजी धसाडे, शहापूर तालुका सचिव माध्य. महेंद्र गायकर इत्यादी शिक्षक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक तसेच धसई ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, बचत गट महिला प्रमुख, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.