भाईंदर : मिरा भाईंदर शहरात सुरु असलेल्या पावसाचा परिणाम शहरातील रस्त्यावर झालेला दिसून येत आहे. उत्तनच्या दिशेने जाणारा भाईंदर सेकंडरी शाळे लगतच्या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे.शाळे जवळील रास्ता खराब असल्याने अपघात होण्याची भीती रस्त्यावर पडलेले खड्डे व रस्त्याच्या मध्ये ठेवलेले प्लास्टिक ब्यारिगेट्समुळे दुचाकी व छोट्या वाहन चालकांची चांगलीच कसरत होत आहे.
मोठी समस्या ही आहे कि बस, टेम्पो सारख्या मोठ्या, अवजड वाहनांच्या वेळी होताना दिसते. रस्त्याला लागून असलेल्या शाळा व लोकवस्तीमुळे पादचाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे आणि अश्यातच मोठ्या व अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.
शाळेचा परिसर असल्याने या रस्त्याची डागडुजी त्वरेने करण्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. असे स्थानिक लोकांची मागणी आहे. म्हणूनच पालिका प्रशासनाने या रस्त्याच्या डागडुजीचे काम लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.निदान शाळे लगतचे रस्ते तरी सुरक्षित असावेत. अशी नागरिकांची मागणी.
000000
