ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ ठाणे अमिगो आणि शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. ठाणे शहरातील बाऊलेवार्ड मॉल आणि माजिवडा व्हिलेज या ठिकाणी एकाच वेळी झालेल्या शिबिरातून सुमारे ४३ युनिट्स रक्त जमा करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी यांनी आभार व्यक्त केले असून रोटरीतर्फे आणखी समाजपयोगी उपक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.
00000
