मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेडंट व मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे सेक्रेटरी संजय बुतकर हे मुंबई पोर्टच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने गोदीतील परिवार ८३ ग्रुपतर्फे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिध्दीप्रमुख मारुती विश्वासराव यांच्या हस्ते संजय बूतकर व त्यांची पत्नी मीना बुतकर यांचा शाल, पुष्पगुच्छ, संपूर्ण पोशाख व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सेवानिवृत्त शेड सुप्रीटेंडंट जे. पी. मुजावर, शेखर बर्वे, प्रकाश परब, उमाकांत थळकर आदी मान्यवर उपस्थित होते.