नवी मुंबई : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधीक्षक डाकघर, नवीमुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील 51 रिक्त पदे भरली जाणार असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी केली आहे.
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आपले अर्ज अधिक माहितीसाठी नियम व अटी पुढील संकेतस्थळावर ऑनलाईन https://indiapostgdsonline.gov.in अर्ज भरण्याची शेवटची 05 ऑगस्ट पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन करावेत. उमेदवारांचे इतर कोणत्याही मांध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश (हस्तेपोच) आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनेनुसार शुल्क फी भरावे लागेल.
पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. सबंधित प्राधिकरणाद्वारेचे सदर उमेदवारांशी,पत्रव्यवहार जर असेल तर केला जातो. उमेदवारांनी वैयक्तिक माहिती/ नोंदणी क्रमांक/मोबाईल क्रमांक/ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत किंवा कोणत्याही अनैतिक फोन कॉल्सपासून सावध रहावे असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *