मुंबई : मुंबईतीली चाकरमन्यांसाठी एख खुषखबर आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून दोन दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होते. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य आणि कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करून, त्यांचे तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटात प्रतीक्षा यादीची क्षमता पूर्ण झाली. तर, आता पश्चिम आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. गणपती विशेष रेल्वेगाड्यांपैकी गाडी क्रमांक ०९००२, ०९०१०, ०९०१६, ०९४११, ०९१४९ या पाच विशेष गाड्यांचे आरक्षण २८ जुलै रोजी सुरू होणार आहे.

गाडी क्रमांक ०९००१ मुंबई सेंट्रल – ठोकूर (साप्ताहिक) विशेष तिकीट दरासह मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवारी – ३, १० आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी ८.५० वाजता ठोकूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९००२ ठोकूर – मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) विशेष तिकीट दरासह ठोकूर येथून दर बुधवारी – ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर, १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी मुंबई सेंट्रलला सकाळी ७.०५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (आठवड्यातील ६ दिवस) विशेष तिकीटदरासह मुंबई सेंट्रल येथून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावेल. २ ते १६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०९०१० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष तिकीटदरासह सावंतवाडी रोडवरून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या दिवशी धावेल. ३ ते १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मुंबई सेंट्रलला रात्री ८.१० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह अहमदाबाद येथून ३, १० आणि १७ सप्टेंबर रोजी म्हणजे दर मंगळवारी सकाळी ०९:३० वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी कुडाळला पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९४११ कुडाळ – अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह कुडाळ येथून ४, ११ आणि १८ सप्टेंबर रोजी म्हणजे बुधवारी पहाटे ४.३० वाजता पोहचेल. दुसऱ्या दिवशी अहमदाबादला रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९१५० विश्वामित्री – कुडाळ (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह विश्वामित्री येथून २, ९ आणि १६ सप्टेंबर रोजी दर सोमवारी सकाळी १० वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुडाळला पोहचेल. गाडी क्रमांक ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह कुडाळ येथून ३, १० आणि १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता विश्वामित्रीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरू (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह अहमदाबाद येथून ६, १३, २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरु – अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष तिकीटदरासह मंगळुरु येथून ७, १४ आणि २१ सप्टेंबर सुटेल. तर, तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता पोहोचेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *