ठाणे : भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने कोपरी परिसरातील सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना १५ हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. काल मुसळधार पावसातही शेकडो विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या शैक्षणिक सेवाकार्यात सहभाग घेतला.
तारामाऊली संस्थेकडून कोपरी परिसरातील विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी वह्या देण्याचा उपक्रम हा राबविला जातो. माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजपा युवा मोर्चाचे सचिव ओमकार भरत चव्हाण यांच्यावतीने कोपरी परिसरातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वह्यांची भेट देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळात हा उपक्रम प्रसिद्ध आहे.
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी असे उपक्रम महत्त्वाचे असतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाची आणि उत्तम भविष्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. तसेच मुलांच्या भविष्यासाठी मदतीचा आहे, अशा शब्दांत आमदार केळकर व आमदार डावखरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी भावनाताई भरत चव्हाण, डॉ. सोनल चव्हाण, भाजपाचे कोपरी मंडल अध्यक्ष शिवाजी रासकर, प्रभाग अध्यक्ष मंदार पाटोळे, कोपरी महिला मंडल अध्यक्षा सुवर्णा अवसरे, युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष निलेश कुशवाह, श्रुतिका कोळी-मोरेकर, सुचित्रा भोईर, गणेश भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
00000
