मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पक्ष प्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे उद्धवजी ठाकरे यांच्या उत्तम, निरोगी , सुदृढ व दीर्घायुष्यासाठी “आदिशक्ती महायज्ञ”चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास मागाठाणे विधानसभा प्रमुख श्री. अशोक म्हामुणकर, संपर्क प्रमुख श्री. नंदकुमार मोरे , विधानसभा निरीक्षक श्री. शशिकांत झोरे, उपविभाग प्रमुख श्री. चेतन कदम, विधानसभा समन्वयक सौ. रोहिणी चौगुले, शाखा समन्वयक, उपशाखा प्रमुख, उपशाखा संघटक, गट प्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा प्रमुख अशोक परब व शाखा समन्वयक श्री. अमित मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
